No title

Admin

 वाळेखिंडी( ता.जत) येथे बिबट्याचा बावराने नागरीकात भितीचे वातावरण

वाळेखिंडी येथे गेल्या पाच सहा दिवसापासून बिबट्याचा वावर दिसून येत असून दिवसा ढवळ्या येथील शेतकरी एम.आर.पाटील यांच्या वस्तीवरील एक रेड्यावरहल्ला हल्ला करून ग॔भीर जखमी केल्याने राज्याचा म्रुत्यु झाला तर बिबट्याने अनेक याच वस्तीवरील कोंबड्याही फस्त केले असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याचा वनविभागाने त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकातून होत आहे.

गेल्या आठवड्यापासून येथील शेतकऱ्यांना बिबट्याचा वावर, दिसून येत असून हा बिबट्या गुळवंची, वाळेखिंडी परिसरात ऊसाचा आसरा घेऊन वावरत आहे.ही माहिती वन विभागाला कळविण्यात आल्याने वन विभागाचे आटपाडी,कवठेमहांकाळ तसेच जत येथील कर्णचारी बिबट्याला अन्यत्र हुसकावण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र परिसरातील ऊस व दाट झाडीचा फायदा घेऊन येथेच बस्तान बांधला आहे. यामुळे परिसरातील शेतकर्यांना शेतात काम करतांना फिती निर्माण झाली असून अचानक बिबट्याचा हल्ला होईल या भितीने शेतकरी शेतात जाण्याचे सोडून दिले. बिबट्याला पकडायचेच झाले तर नागपूर येथील वन विभागाच्या पथकाला  बोलावून घेणे गरजेचे आहे.त्याला हुसकावण्याचा नादात परत येऊन नागरीकावर किंवा प्राण्यावर हल्ला करील अशी भिती व्यक्त होत आहे.वन विभागाने त्वरीत या बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला लांबच्या ज॔गलात सोडावे तसेच एम.आर.पाटील यांच्या शेतातील फस्त केलेल्या कोंबड्यांची व बिबट्याच्या हल्ल्यात ग॔भीर जखमी होऊन म्रुत्यू पावलेल्या रेडीचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

To Top